शोधून पाहिले मी
शोधून पाहिले मी कोटी नरा मधी
सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामधी ।
पाषाण फोडणारा एक मुठीमधी
सांगा तो जोम आहे कुठल्या करामधी ।।
कोटीच्या काळजाचा झाला अधीपती
जयभीम आज आहे कोटी घरामधी ।।
वामन भीमापरी धर्मांतरित व्हा
राष्ट्रचे हीत आहे धर्मांतरामधी ।।