भीमराया तुझी गोडगाणी
भीमराया तुझी गोड गाणी
रोज माझ्या पडावीत कानी
भरी कानी तुझी गोड वाणी
तोच प्राणी इथे जीव जाणी...।।
तझ्या तत्त्वाची घेऊन शिदोरी
जिथे भरती मनाची तिजोरी
तीच होई तिथे डाळ भाजी
तीच भाकर तिथे तीच पाणी...।।
भीमराया तुझी भीमवाणी
शाहिरांची नवी गीत गाणी
तीच आता इथे माणसाला
माणसाचे नवे रुप आणी...।।
तुझी मायेची ममतेची गोडी
मला दावील तुझी भीमवाडी
तीच आता तुझ्या वामनाला
आज नेईल ठरल्या ठिकाणी...।।