भीमाच्या पायवाटेची
भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आहे
नदी नाही तरी ओढ्यातली झुळ झुळ मी आहे ।।
विकासारे, विकासानो विकासा जा फुला सारे
विकासे बौधीवृक्ष जो तयाचे मूळ मी आहे ।।
गुलामाच्या विकासाचे भीमाला खूळ जे जडले
भीमाच्या त्या विकासाच्या खुळातील खूळ मी आहे ।॥
भूमी कसली भीमाची ही आशा आजी आणि माजी
कुळाच्या नेक नगरीच्या कुळातील कूळ मी आहे ।।
लवे लवचिक होऊनी लव्हाळा मी जरी वामन
मला छळती अशा साठी सुळातील सूळ मी आहे ।।