भिमाई
दारात काल आली, माझीच भिमाई
आईचा हात झाली, माझीच भिमाई...।।धृ।।
तिनेच काल मजला, उचलून घेतले
अश्रूत काल न्हाली, माझीच भिमाई...।।१।।
सारे उपास पोटी, उचलून घेतले
साऱ्याची माय झाली, माझीच भिमाई...।।२।।
वामन परी सुगीच्या, झोळीत झोपता
अंगाई गात होती, माझीच भिमाई... ।।३।।