भीमाच्या डोळ्यांनी
भीमाच्या डोळ्यांनी त्या भीमाच्या डोळ्यांनी
दुनिया दाखवली त्या भीमाच्या डोळ्यांनी ।।धृ।।
सागरतळाला ते जाऊनी आले
आमच्यासाठी ते काही घेऊनी आले
कामगिरी केली त्या महान कोळ्यानी ।।१।।
मधा परी साठा केला भीमानं असा
साऱ्यांना वाटा दिला भीमानं असा
काम असे केले त्या मधाच्या पोळ्यांनी ।।२।।
मनुच्या ग्रंथाच्या आज बांधून मोळ्या
मनुच्या ग्रंथाच्या आज होतात होळ्या
आनंदतो वामन त्या होणाऱ्या होळ्यांनी ।।३।।