भीमा विचार तुझा
भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे दार आहे,
शीलाचे भांडार आहे...।।धृ।।
स्थापिला तूच इथे लोकहिताचा पक्ष ।
वेधीले तूच इथे साऱ्या जगाचे लक्ष ।
दलित क्रांतिवरी आज तुजे उपकार आहे...।।१।।
समाज संधीची मागणी तुझी मोठी ।
नव तरुण तुझे सारे घोळती ओठी ।
नवा निर्धार तुझा विचाराचा सार आहे...।।२।।
ठेवले इथे आज तुझ्या छायेला ।
तेच तुझ्या या इथे मायेला ।
सावली गार आहे, अमृताची धार आहे...।।३।।
वामन भावी पिढी गीत तुझं आठविल ।
गेल्यापाठी तुला केव्हा तरी कळविल ।
सुखी संसार, चांगले संस्कार आहे... ।।४।।
Please sir hya song chi link send kara n
ReplyDeletehttps://mega.nz/file/OYhSQSgC#vfZSWTAowKKQusMGFKUdKeBPGvKYqay1jzcXmIumKqA
Delete