मुंबईचा एक अधिकारी
मुंबईचा एक अधिकारी, त्या राजदरबारी आला
परी जात कळेना...।।धृ।।
मराठा नरेश परी गुजरात देश ।
उलटीच बोली तिथं उलटाच वेष ।
कुरकुरती सारे कर्मचारी, त्या राजदरबारी...।।१।।
आंबेडकर नावाचा उमदा तरुण ।
फेडण्या आलो म्हणे राजाचे ऋण ।
चर्चा ही बडोद्यात सारी, पत्करली जशी सरदारी. ।।२।।
साधा चपराशी बोले हलक्या सुरात ।
आहात कोण तुम्ही सांगा की जात ।
कोण तुम्ही हालके वा भारी, या राजदरबारी...।।३।।
तार कुणी करणार वामन परी ।
साहेबाच्या नोकरीवर गेल्यावरी ।
हळुहळु भीमाला विचारी, त्या राजदरबारी...।।४।।