भरला दिल्ली दरबार
भरला दिल्ली दरबार आज
दलिता भरला दिल्ली दरबार... ।।धृ।।
भीमराज झाल्याती कायदा पंडित
दिन दुबळ्याचं कराया हित
घेतलाय हाती कारभार... ।।१।।
नवं नवं कायदं केलं भिमानं
नांदेल दुनिया आता सुखानं
देशात होईल उध्दार... ।।२।।
न्हाय कुणी आता गरीब रह्याणार
ज्याला न्हाय त्याला जमिनी मिळणार
म्हणतंय असं सरकार... ।।३।।
दहा वर्षांत दिल्यात राखीव जागा
त्यानं काय होणार आणिक मागा
कशापाई घेता माघार... ।।४।।
वामन धीर तुझा सुटला कशानं
जोवर भीम हायत माग तुझं मागनं
तेच हाईत तुझा आधार... ।।५।।