भल्या पहाटे
आली भल्या पहाटे
गेली भल्या पहाटे ।।धृ।।
झोपेत विश्व सारे, आपल्या भल्या पहाटे
बुध्दा समान क्रांती, ती आली भल्या पहाटे ।।१।।
जाळीत जीव असता, चैत्रातला उन्हाळा
फुलवित अशा वेळी, वेली भल्या पहाटे ।।२।।
वैशाली पौर्णिमेला, देण्या पुन्हा उजाळा
एप्रिल मधील चौदा, आली भल्या पहाटे ।।३।।
वामन तुझी ती माता, निर्वाण पावताना
चादर निळ्या फुलांची, ल्याली भल्या पहाटे ।।४।।