आवाज हा भीमाचा
कानात काल आला
आवाज हा भीमाचा
माझाच काल झाला
आवाज हा भीमाचा ।।धृ।।
सारे उपास पोटी, आले फडा मधी
तारील मानसाला आवाज हा भीमाचा ।।१।।
होऊन लोकशाही आला भूमीवरी
इतका महान झाला आवाज हा भीमाचा ।।२।।
आला जगात आला आवाज हा भीमाचा
बुध्दाची हाक झाला आवाज हा भीमाचा ।।३।।
कर मुक्त माणसाला हो मुक्तीचा लढा
वामन तुला मिळाला आवाज हा भीमाचा ।।४।।