सयांनो याना गं...
सयांनो याऽना गं, हलवा तान्हा ग
म्हणा पाळणा, म्हणा पाळना ।।धृ।।
पाळणा माझा पहिला, जन्मला राजा पहिला
आहे पहिलीच पाळी बोलती साऱ्या महिला
जोजवा बाळाला नव्या वेल्हाळाला ।।१।।
पोरपण गेलं आता
आता मी झाले माता
गीत अंगाई शिकवा
मला ही जाता, जाता
कसा पाजू मी पान्हा, कसा निजवू मी तान्हा ।।२।।
माझा सिंहाचा छावा
असा रणधीर व्हावा
भीम सेनेचा मोठा
एक सैनिक व्हावा
जगा तारील ऐसा वैरी मारील ऐसा ।।३।।
काल वामन म्हणाला
सांग जा जा ग जनाला
मुठी आवळीत आला
एक जयभीम वाला
उसळत्या रक्ताचा भीमाच्या भक्ताचा ।।४।।