महात्मा ज्योतिबा फुले | Mahatma Jyotiba Phule Yanchi Mahiti | Information About Mahatma Jyotiba Phule

महात्मा ज्योतिबा फुले  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये पुणे येथे झाला. जातीव्यवस्था, भेदभाव, उच-नीच, स्पृश्य-अस्पृश्य. अशा अनेक वाईट रूढींनी ग्रस्त झालेल्या काळामध्ये महात्मा फुले लहानाचे मोठे झाले. या वाईट रूढींचा जाच त्यांना सहन होईनासा झाला. शुद्रांचे हाल त्यांना पहावले नाही. असाच एक वाईट अनुभव त्यांनाही आला. ज्योतीबा एकदा आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता, वरातीमध्ये ब्राह्मणांनी त्यांचा क्षुद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीत सहभागी करून न घेता वरातीच्या पाठीमागून यायला सांगितले. या जळजळीत अनुभवानंतर ज्योतीबा फुले यांच्या मनात सामाजिक विषमतेबद्दल चीड निर्माण झाली. या सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, असा त्यांनी मनाशी ठाम निर्धार केला आणि हा संघर्ष व लोकजागृती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यातल्या त्यात स्त्री ही तर साऱ्या विश्वाची जननी. स्त्रीने शिक्षण घेतले तर संपूर्ण कुटुंबच सुशिक्षित होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता.   स्वत:चे शिक्षण चालू असतानाच स्वातंत्र्य आणि लोककल्याणासाठी त्यांनी स्वत:ला झोकून द्यायचे ठरवले. अज्ञानाचा काळाकुट्ट अंधार दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शस्त्र नाही. हे ज्योतिबा जाणून होते. पेशवाई गेली आणि इंग्रजी राजवटीने देशात बस्तान मांडले; परंतु तरीही जनमानसांवर पेशवाईचा प्रभाव होता. त्या काळात पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. अशा परिस्थितीतच त्यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू केली; परंतु शिक्षक ? त्या काळात शिक्षक मिळणे कठीण होऊन बसले. मग त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाच शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून शाळेतील मुलींना शिकविण्याची जबाबदारी दिली. सावित्रीबाईदेखील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक आणि लोकहिताच्या विचारांना खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाई मुलींच्या शाळेत शिकवू लागल्या. ही गोष्ट त्याकाळी काही कर्मठ लोकांना पटली नाही. म्हणून त्यांनी सावित्रीबाईचा नाना प्रकारे छळ सुरू केला. त्या शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर चिखल फेकणे, शेणाचे गोळे फेकणे असे नाना : प्रकार त्या कर्मठ लोकांनी सुरू केले, पण सावित्रीबाई इगमगल्या नाहीत, असे बरेच प्रसंग पचवून त्यांनी मुलींना शिकवणे सुरूच ठेवले. आज याच शिक्षणदेवतेमुळे आपल्या समाजात मुली शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांत उच्चस्थानी आहेत. म्हणूनच आज कर्तबगार स्त्रियांना सावित्रीच्या लेकी म्हटलं जातं..   सावित्रीबाईची भक्कम साथ मिळाल्यानंतर ज्योतिबांनी समाजकार्यात विशेष रस घेतला. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक सामाजिक कार्ये हाती घेतली. अस्पृश्य मुलांसाठी १८५७ साली त्यांनी आणखी शाळा काढली. तेथे मोफत शिक्षण सुरू केले. त्याकाळी शेतकरी व मजूर यांची स्थितीदेखील खूप वाईट होती. अशिक्षित शेतकरी व मजुरांची फसवणूक होई. त्यामुळेच ज्योतिबांनी त्यांच्याही शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी वसतिगृहे काढली. चूल आणि मूल या संकल्पनेतच अडकलेल्या स्त्रियांना साक्षर करण्याचे कार्य ज्योतिबांनी हाती घेतले होते, पण तरीही काही अडाणी विचारांमुळे अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहात होत्या. स्त्रीला पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा नसलेल्या काळात निरक्षर असलेल्या स्त्रियांवर अनेक अत्याचार होत. पुरुषी अत्याचाराला आणि वासनेला बळी पडलेल्या स्त्रिया नवीन जन्माला येणाऱ्या अर्भकाची हत्या करत. कधी- कधी अनैतिक मार्गातून जन्माला येणाऱ्या अनौरस संततीच्या भीतीनेही भ्रूणहत्या केली जायची. ज्योतिबांनी या गोष्टीवर प्रकाश टाकत १८६४ मध्ये 'भ्रूणहत्या प्रतिबंधक' गृह सुरू केले. आपल्या राहत्या घरातच सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह हे भारतातील पहिले होते. पीडित महिलांनी या गृहात गुप्तपणे बाळंत व्हायचे, आपले मूल न्यायचे किंवा येथेच ठेवायचे असा त्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचा नियम ज्योतिबांनी घालून दिला, त्या बेवारस मुलांची काळजी घेण्यासाठी ज्योतिबांनी आश्रम सुरू केला. पुढे याच आश्रमातील एक यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. ज्योतिबांनी विधवांच्या केशवपनाला आणि बहुपत्नीकत्वालाही विरोध केला.   इकडे शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांचे कार्य में चालूच होते; परंतु समाजातील गरीब, श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदभाव काही मिटत नव्हते. त्यांनी मग अस्पृश्यांसाठी १८५२ मध्ये एक शाळा सुरू केली. उच्चवर्णियांनी अस्पृश्यांचे अतोनात हाल चालवले होते. त्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधला जात असे.त्यांचा पाणवठाही वेगळा होता. यावरून ज्योतिबांनी आपल्या घराजवळचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. त्यांनी अस्पृश्य निर्मूलनाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी 'सत्यशोधक समाज' ही संस्था स्थापन केली. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्यांचा आसूड', 'सार्वजनिक सत्यधर्म' असे ग्रंथही त्यांनी लिहिले. महात्मा फुलेंचे कार्य सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे व क्रांतिकारक होते. गुलामगिरीच्या ओझ्याने पिचलेल्या बहुजन समाजाला स्वजागृत व शिक्षित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना 'महात्मा ' ही उपाधी बहाल करण्यात आली. आपले उभे आयुष्य समाजहितासाठी खर्ची घातलेल्या या महान नेत्याचा २७ नोव्हेंबर १८९० रोजी अंत झाला. ते अनंतात विलीन झाले.

महात्मा ज्योतिबा फुले


महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये पुणे येथे झाला. जातीव्यवस्था, भेदभाव, उच-नीच, स्पृश्य-अस्पृश्य. अशा अनेक वाईट रूढींनी ग्रस्त झालेल्या काळामध्ये महात्मा फुले लहानाचे मोठे झाले. या वाईट रूढींचा जाच त्यांना सहन होईनासा झाला. शुद्रांचे हाल त्यांना पहावले नाही. असाच एक वाईट अनुभव त्यांनाही आला. ज्योतीबा एकदा आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता, वरातीमध्ये ब्राह्मणांनी त्यांचा क्षुद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीत सहभागी करून न घेता वरातीच्या पाठीमागून यायला सांगितले. या जळजळीत अनुभवानंतर ज्योतीबा फुले यांच्या मनात सामाजिक विषमतेबद्दल चीड निर्माण झाली. या सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, असा त्यांनी मनाशी ठाम निर्धार केला आणि हा संघर्ष व लोकजागृती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यातल्या त्यात स्त्री ही तर साऱ्या विश्वाची जननी. स्त्रीने शिक्षण घेतले तर संपूर्ण कुटुंबच सुशिक्षित होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता.


स्वत:चे शिक्षण चालू असतानाच स्वातंत्र्य आणि लोककल्याणासाठी त्यांनी स्वत:ला झोकून द्यायचे ठरवले. अज्ञानाचा काळाकुट्ट अंधार दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शस्त्र नाही. हे ज्योतिबा जाणून होते. पेशवाई गेली आणि इंग्रजी राजवटीने देशात बस्तान मांडले; परंतु तरीही जनमानसांवर पेशवाईचा प्रभाव होता. त्या काळात पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. अशा परिस्थितीतच त्यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू केली; परंतु शिक्षक ? त्या काळात शिक्षक मिळणे कठीण होऊन बसले. मग त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाच शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून शाळेतील मुलींना शिकविण्याची जबाबदारी दिली. सावित्रीबाईदेखील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक आणि लोकहिताच्या विचारांना खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाई मुलींच्या शाळेत शिकवू लागल्या. ही गोष्ट त्याकाळी काही कर्मठ लोकांना पटली नाही. म्हणून त्यांनी सावित्रीबाईचा नाना प्रकारे छळ सुरू केला. त्या शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर चिखल फेकणे, शेणाचे गोळे फेकणे असे नाना : प्रकार त्या कर्मठ लोकांनी सुरू केले, पण सावित्रीबाई इगमगल्या नाहीत, असे बरेच प्रसंग पचवून त्यांनी मुलींना शिकवणे सुरूच ठेवले. आज याच शिक्षणदेवतेमुळे आपल्या समाजात मुली शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांत उच्चस्थानी आहेत. म्हणूनच आज कर्तबगार स्त्रियांना सावित्रीच्या लेकी म्हटलं जातं..


सावित्रीबाईची भक्कम साथ मिळाल्यानंतर ज्योतिबांनी समाजकार्यात विशेष रस घेतला. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक सामाजिक कार्ये हाती घेतली. अस्पृश्य मुलांसाठी १८५७ साली त्यांनी आणखी शाळा काढली. तेथे मोफत शिक्षण सुरू केले. त्याकाळी शेतकरी व मजूर यांची स्थितीदेखील खूप वाईट होती. अशिक्षित शेतकरी व मजुरांची फसवणूक होई. त्यामुळेच ज्योतिबांनी त्यांच्याही शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी वसतिगृहे काढली. चूल आणि मूल या संकल्पनेतच अडकलेल्या स्त्रियांना साक्षर करण्याचे कार्य ज्योतिबांनी हाती घेतले होते, पण तरीही काही अडाणी विचारांमुळे अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहात होत्या. स्त्रीला पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा नसलेल्या काळात निरक्षर असलेल्या स्त्रियांवर अनेक अत्याचार होत. पुरुषी अत्याचाराला आणि वासनेला बळी पडलेल्या स्त्रिया नवीन जन्माला येणाऱ्या अर्भकाची हत्या करत. कधी- कधी अनैतिक मार्गातून जन्माला येणाऱ्या अनौरस संततीच्या भीतीनेही भ्रूणहत्या केली जायची. ज्योतिबांनी या गोष्टीवर प्रकाश टाकत १८६४ मध्ये 'भ्रूणहत्या प्रतिबंधक' गृह सुरू केले. आपल्या राहत्या घरातच सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह हे भारतातील पहिले होते. पीडित महिलांनी या गृहात गुप्तपणे बाळंत व्हायचे, आपले मूल न्यायचे किंवा येथेच ठेवायचे असा त्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचा नियम ज्योतिबांनी घालून दिला, त्या बेवारस मुलांची काळजी घेण्यासाठी ज्योतिबांनी आश्रम सुरू केला. पुढे याच आश्रमातील एक यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. ज्योतिबांनी विधवांच्या केशवपनाला आणि बहुपत्नीकत्वालाही विरोध केला.


इकडे शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांचे कार्य में चालूच होते; परंतु समाजातील गरीब, श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदभाव काही मिटत नव्हते. त्यांनी मग अस्पृश्यांसाठी १८५२ मध्ये एक शाळा सुरू केली. उच्चवर्णियांनी अस्पृश्यांचे अतोनात हाल चालवले होते. त्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधला जात असे.त्यांचा पाणवठाही वेगळा होता. यावरून ज्योतिबांनी आपल्या घराजवळचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. त्यांनी अस्पृश्य निर्मूलनाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी 'सत्यशोधक समाज' ही संस्था स्थापन केली. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्यांचा आसूड', 'सार्वजनिक सत्यधर्म' असे ग्रंथही त्यांनी लिहिले. महात्मा फुलेंचे कार्य सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे व क्रांतिकारक होते. गुलामगिरीच्या ओझ्याने पिचलेल्या बहुजन समाजाला स्वजागृत व शिक्षित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना 'महात्मा ' ही उपाधी बहाल करण्यात आली. आपले उभे आयुष्य समाजहितासाठी खर्ची घातलेल्या या महान नेत्याचा २७ नोव्हेंबर १८९० रोजी अंत झाला. ते अनंतात विलीन झाले.


Post a Comment (0)
Previous Post Next Post