लोकमान्य टिळक | Lokmanya Tilak Yanchi Mahiti | Information About Lokmanya Tilak

लोकमान्य टिळक   "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच", असे इंग्रजांना ठणकावून सांगत स्वातंत्र्याची ज्योत भारतीयांच्या मनामनात पेटविणारे थोर समाजसेवक, भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे मूळ नाव केशव होते; परंतु 'बाळ' हे टोपण नावच कायम राहिले आणि त्याच नावाने ते ओळखू लागले. टिळकांचा जन्म रत्नागिरीमधील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला . त्यांचे वडील गंगाधरपंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते. नंतर पुढे ते शिक्षण निरीक्षक बनले. टिळक १० वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गंगाधरपंत यांची बदली पुण्यात झाली. परिणामी, बाळ गंगाधर टिळकांचे शिक्षण पुण्यातच झाले.   सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे एल.एल.बी. करत असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला . ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जखडलेल्या आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जनमानसांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून  देण्यासाठी लोकजागृती करण्यासाठी आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी या दोन नेत्यांनी स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय केला. आपली विचारधारा जनतेपर्यंत पोचावी म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेत "मराठा" व मराठी भाषेत "केसरी" ही वृत्तपत्रे सुरू केली. याच वृत्तपत्रांमधून इंग्रज, सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" असे निर्भिड अग्रलेख त्यांनी वृत्तपत्रांमधून - जनतेसमोर मांडले. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपतीच्या वेळी इंग्रज सरकारकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी निषेध केला. वृत्तपत्रातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली.   इंग्रज सरकारशी लढा देण्यासाठी आपला समाज, आपली जनता एकसंघ हवी. जनतेमध्ये एकजूट असायला हवी. स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजात लोकजागृती व्हायला हवी हे टिळकांनी हेरले होते आणि याच उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सार्वजनिक स्वरुपात सुरु केले. हिंदुस्थानातील क्रांतिकारक आंदोलनाचा उगम या उत्सवात होता. अनेक कलावंत या उत्सवात सहभागी होऊन जनमानसापर्यंत स्वातंत्र्याचे महत्त्व पोचवायचे. गीत गायन आणि पोवाडे यांच्या माध्यमातून देशहित आणि स्वातंत्र्याची उर्मी जनतेच्या मनात निर्माण करायचे. १९०५ साली इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली. सर्व बंगाल पेटून उठला. सरकारने दडपशाही केली. टिळकांनी केसरीमधून सरकारचा निषेध केला, केसरीमधल्या निर्भिड आणि कडक शब्दांत अग्रलेखामधून केलेला निषेध सरकारला सहन झाला नाही. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शेवटी त्या जुलमी इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांचे फार-फार हाल झाले. तशाही अवस्थेत त्यांनी भगवतगीतेवर आधारित गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याआधी त्यांनी 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन दि वेदाज' हे दोन संशोधनपर ग्रंथही लिहिले होते. टिळक विद्वान होते आणि चलाखही! इंग्रजाविरुद्ध त्यांनी जनतेला जागे केले. परकीय सत्तेच्याविरुद्ध जनतेला उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले आणि म्हणून त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' ही उपाधी मिळाली. ८ जून १९१४ रोजी लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. पुढे त्यांची प्रकृती फारच बिघडली. 'शेवटी ३१ जुलै १९२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि प्रकाशमान तारा अनंतात विलीन झाला.

लोकमान्य टिळक


"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच", असे इंग्रजांना ठणकावून सांगत स्वातंत्र्याची ज्योत भारतीयांच्या मनामनात पेटविणारे थोर समाजसेवक, भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे मूळ नाव केशव होते; परंतु 'बाळ' हे टोपण नावच कायम राहिले आणि त्याच नावाने ते ओळखू लागले. टिळकांचा जन्म रत्नागिरीमधील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला . त्यांचे वडील गंगाधरपंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते. नंतर पुढे ते शिक्षण निरीक्षक बनले. टिळक १० वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गंगाधरपंत यांची बदली पुण्यात झाली. परिणामी, बाळ गंगाधर टिळकांचे शिक्षण पुण्यातच झाले.


सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे एल.एल.बी. करत असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला . ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जखडलेल्या आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जनमानसांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून  देण्यासाठी लोकजागृती करण्यासाठी आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी या दोन नेत्यांनी स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय केला. आपली विचारधारा जनतेपर्यंत पोचावी म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेत "मराठा" व मराठी भाषेत "केसरी" ही वृत्तपत्रे सुरू केली. याच वृत्तपत्रांमधून इंग्रज, सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" असे निर्भिड अग्रलेख त्यांनी वृत्तपत्रांमधून - जनतेसमोर मांडले. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपतीच्या वेळी इंग्रज सरकारकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी निषेध केला. वृत्तपत्रातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली.


इंग्रज सरकारशी लढा देण्यासाठी आपला समाज, आपली जनता एकसंघ हवी. जनतेमध्ये एकजूट असायला हवी. स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजात लोकजागृती व्हायला हवी हे टिळकांनी हेरले होते आणि याच उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सार्वजनिक स्वरुपात सुरु केले. हिंदुस्थानातील क्रांतिकारक आंदोलनाचा उगम या उत्सवात होता. अनेक कलावंत या उत्सवात सहभागी होऊन जनमानसापर्यंत स्वातंत्र्याचे महत्त्व पोचवायचे. गीत गायन आणि पोवाडे यांच्या माध्यमातून देशहित आणि स्वातंत्र्याची उर्मी जनतेच्या मनात निर्माण करायचे. १९०५ साली इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली. सर्व बंगाल पेटून उठला. सरकारने दडपशाही केली. टिळकांनी केसरीमधून सरकारचा निषेध केला, केसरीमधल्या निर्भिड आणि कडक शब्दांत अग्रलेखामधून केलेला निषेध सरकारला सहन झाला नाही. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शेवटी त्या जुलमी इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांचे फार-फार हाल झाले. तशाही अवस्थेत त्यांनी भगवद्गीतेवर आधारित गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याआधी त्यांनी 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन दि वेदाज' हे दोन संशोधनपर ग्रंथही लिहिले होते. टिळक विद्वान होते आणि चलाखही! इंग्रजाविरुद्ध त्यांनी जनतेला जागे केले. परकीय सत्तेच्याविरुद्ध जनतेला उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले आणि म्हणून त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' ही उपाधी मिळाली. ८ जून १९१४ रोजी लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. पुढे त्यांची प्रकृती फारच बिघडली. 'शेवटी ३१ जुलै १९२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि प्रकाशमान तारा अनंतात विलीन झाला.


Post a Comment (0)
Previous Post Next Post