राष्ट्रपिता महात्मा गांधी | Rashtrapita Mahatma Gandhi Yanchi Mahiti | Information About Mahatma Gandhi

राष्ट्रपिता महात्मा गांधी   व्यापारी म्हणून आलेल्या आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी हुकूमशाही नव्हे तर जुलुमशाहीचा निर्दयपणे वापर करत भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी तब्बल दीडशे वर्षे झुंजवले. इंग्रजांच्या तावडीतून सोडवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते आपले महान नेते म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी. लोक त्यांना प्रेमाने मे बापूजी म्हणत असत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे है पूर्ण नाव. काठेवाडात पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी या महान पुरुषाचा जन्म झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. शिक्षण घेत असतानाच अवघ्या १४व्या वर्षीच महात्माजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. त्यावेळी विवाह लवकरच केला जायचा, त्यावेळचे शिक्षणात मॅट्रिकलाही अतिशय महत्त्व होते. ही मॅट्रिक म्हणजे इयत्ता दहावी. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले. बॅरिस्टर झाले आणि वकिली करण्यासाठी ते आफ्रिकेत गेले, तेथे त्यांना वर्णभेदाचा अतिशय वाईट अनुभव आला. काळे-गोरे हा भेदभाव त्यांना दिसून आला. महात्मा गांधींना एकदा स्वत:च या अन्यायाला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवत असत. गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय, जुलूम करत असत. त्यांना गुलामासारखे वागवत असत आणि याच अनुभवाने महात्मा गांधींना आपल्या देशात अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा मिळाली.   महात्मा गांधी आफ्रिकेतून १९१५ साली भारतात. परत आले. सर्वत्र प्रवास करून देशातील जनतेची व जनतेच्या हालअपेष्टांची त्यांनी पाहणी केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी निर्धार केला. अनेकांना आपल्या विचारांनी प्रभावित करत त्यांनी जनतेमध्ये जागृती निर्माण केली. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर में आपल्यामध्ये असलेला जातीभेद, अंधश्रद्धा, गरीब श्रीमंत, उच-नीच, मालक-नोकर ही भेदभावाची भावना पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, हे लोकांना पटवून दिले. अस्पृश्य आणि रंजल्या-गांजल्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव मिटावा यासाठीही मै ते झटले. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला त्यांनी 'हरिजन' हे नाव देत त्यांना समाजात मानाने जगू देण्याचे बळ दिले.   गरीब भारतीय जनता अन्न-वस्त्र-निवारा यापासून अंतरावरच होती. उपासमारी, गरीबी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या नशिबी इंग्रजांची गुलामगिरी करणे ओधानेच आले. भारतीयांची ही अवस्था पाहून वकिली करताना । सुटाबुटात वावरणाऱ्या महात्मा गांधीजींनी भरजरी कपड्यांचा त्याग केला. एक पंचा, एक उपरणे, पायात साध्या चपला व. हातात काठी हीच त्यांची संपत्ती ठरली. त्यांच्या या महान विचारांनी त्यांच्या साध्या राहणीमानाने जनतेच्या मनात 'घर' केले. त्यांच्या या समाजप्रेमी उच्च विचारांनी प्रभावित झालेली जनता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली. त्यांनी गांधीजींचे हात बळकट केले. देशासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार झालेल्या जनसमुदायाच्या साथीने महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी केली.. वेळप्रसंगी आंदोलने छेडली. इंग्रजांच्या जाचक धोरणांना त्यांनी विरोध केला आणि त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गांधीजींनी मोर्चे काढले. सत्याग्रह केले. अनेकदा तुरुंगवासही भोगला.     १९४२ साली महात्मा गांधींनी इंग्रजांना प्रचंड विरोध करत "चले जाव, छोडो भारत" असे म्हणत खूप मोठे आंदोलन छेडले. सारी भारतीय जनता या आंदोलनात सहभागी झाली होती. सारे भारतीय नागरिक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते. इंग्रजांनी आंदोलनावर लाठीमार, गोळीबार केला, असंख्य लोकांना तुरुंगात टाकले, पण स्वातंत्र्यासाठी जो-तो आपले प्राणही द्यायला तयार झाला होता. शेवटी इंग्रजांना हार मानावी लागली. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी आपआपल्या मार्गानी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधींजींनी स्वदेशी वस्तू वापरा म्हणून स्वदेशीला महत्वाचे स्थान दिले. आपल्या देशातील राबणाऱ्या हातांना रोजगार मिळावा हा मूळ उद्देश होता त्यांचा. साधे राहणीमान, समाजहितासाठी साधेपणाने जगणे, हिंदू-मुस्लिम ऐक्य, हिंदी भाषेचा प्रसार आणि अहिंसेच्या मार्गाने शत्रूवर विजय मिळविणे या त्यांच्या थोर विचारांमुळे जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आणि राष्ट्रपिता म्हणूनही जनता त्यांचा सन्मान करते.   १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. अनेक थोर नेत्यांनी, शूरवीरांनी देशासाठी बलिदान केले. इंग्रज आपला देश सोडून निघून गेले. भारत स्वतंत्र झाला ; परंतु देशाची फाळणी झाली. एकाच देशाचे दोन देश निर्माण झाले, काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी १९४८ रोजी या महात्म्याची हत्या झाली. ते हुतात्मा झाले. खरंच 'महात्मा' म्हणजेच महान आत्मा होते ते!

राष्ट्रपिता महात्मा गांधी


व्यापारी म्हणून आलेल्या आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी हुकूमशाही नव्हे तर जुलुमशाहीचा निर्दयपणे वापर करत भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी तब्बल दीडशे वर्षे झुंजवले. इंग्रजांच्या तावडीतून सोडवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते आपले महान नेते म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी. लोक त्यांना प्रेमाने मे बापूजी म्हणत असत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे है पूर्ण नाव. काठेवाडात पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी या महान पुरुषाचा जन्म झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. शिक्षण घेत असतानाच अवघ्या १४व्या वर्षीच महात्माजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. त्यावेळी विवाह लवकरच केला जायचा, त्यावेळचे शिक्षणात मॅट्रिकलाही अतिशय महत्त्व होते. ही मॅट्रिक म्हणजे इयत्ता दहावी. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले. बॅरिस्टर झाले आणि वकिली करण्यासाठी ते आफ्रिकेत गेले, तेथे त्यांना वर्णभेदाचा अतिशय वाईट अनुभव आला. काळे-गोरे हा भेदभाव त्यांना दिसून आला. महात्मा गांधींना एकदा स्वत:च या अन्यायाला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवत असत. गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय, जुलूम करत असत. त्यांना गुलामासारखे वागवत असत आणि याच अनुभवाने महात्मा गांधींना आपल्या देशात अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा मिळाली.


महात्मा गांधी आफ्रिकेतून १९१५ साली भारतात. परत आले. सर्वत्र प्रवास करून देशातील जनतेची व जनतेच्या हालअपेष्टांची त्यांनी पाहणी केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी निर्धार केला. अनेकांना आपल्या विचारांनी प्रभावित करत त्यांनी जनतेमध्ये जागृती निर्माण केली. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर में आपल्यामध्ये असलेला जातीभेद, अंधश्रद्धा, गरीब श्रीमंत, उच-नीच, मालक-नोकर ही भेदभावाची भावना पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, हे लोकांना पटवून दिले. अस्पृश्य आणि रंजल्या-गांजल्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव मिटावा यासाठीही मै ते झटले. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला त्यांनी 'हरिजन' हे नाव देत त्यांना समाजात मानाने जगू देण्याचे बळ दिले.


गरीब भारतीय जनता अन्न-वस्त्र-निवारा यापासून अंतरावरच होती. उपासमारी, गरीबी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या नशिबी इंग्रजांची गुलामगिरी करणे ओधानेच आले. भारतीयांची ही अवस्था पाहून वकिली करताना । सुटाबुटात वावरणाऱ्या महात्मा गांधीजींनी भरजरी कपड्यांचा त्याग केला. एक पंचा, एक उपरणे, पायात साध्या चपला व. हातात काठी हीच त्यांची संपत्ती ठरली. त्यांच्या या महान विचारांनी त्यांच्या साध्या राहणीमानाने जनतेच्या मनात 'घर' केले. त्यांच्या या समाजप्रेमी उच्च विचारांनी प्रभावित झालेली जनता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली. त्यांनी गांधीजींचे हात बळकट केले. देशासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार झालेल्या जनसमुदायाच्या साथीने महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी केली.. वेळप्रसंगी आंदोलने छेडली. इंग्रजांच्या जाचक धोरणांना त्यांनी विरोध केला आणि त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गांधीजींनी मोर्चे काढले. सत्याग्रह केले. अनेकदा तुरुंगवासही भोगला. 


१९४२ साली महात्मा गांधींनी इंग्रजांना प्रचंड विरोध करत "चले जाव, छोडो भारत" असे म्हणत खूप मोठे आंदोलन छेडले. सारी भारतीय जनता या आंदोलनात सहभागी झाली होती. सारे भारतीय नागरिक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते. इंग्रजांनी आंदोलनावर लाठीमार, गोळीबार केला, असंख्य लोकांना तुरुंगात टाकले, पण स्वातंत्र्यासाठी जो-तो आपले प्राणही द्यायला तयार झाला होता. शेवटी इंग्रजांना हार मानावी लागली. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी आपआपल्या मार्गानी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधींजींनी स्वदेशी वस्तू वापरा म्हणून स्वदेशीला महत्वाचे स्थान दिले. आपल्या देशातील राबणाऱ्या हातांना रोजगार मिळावा हा मूळ उद्देश होता त्यांचा. साधे राहणीमान, समाजहितासाठी साधेपणाने जगणे, हिंदू-मुस्लिम ऐक्य, हिंदी भाषेचा प्रसार आणि अहिंसेच्या मार्गाने शत्रूवर विजय मिळविणे या त्यांच्या थोर विचारांमुळे जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आणि राष्ट्रपिता म्हणूनही जनता त्यांचा सन्मान करते.


१५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. अनेक थोर नेत्यांनी, शूरवीरांनी देशासाठी बलिदान केले. इंग्रज आपला देश सोडून निघून गेले. भारत स्वतंत्र झाला ; परंतु देशाची फाळणी झाली. एकाच देशाचे दोन देश निर्माण झाले, काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी १९४८ रोजी या महात्म्याची हत्या झाली. ते हुतात्मा झाले. खरंच 'महात्मा' म्हणजेच महान आत्मा होते ते!

Post a Comment (0)
Previous Post Next Post