राजर्षी शाहू महाराज | Rajarshi Shahu Maharaj | Information About Rajarshi Shahu Maharaj in Marathi

राजर्षी शाहू महाराज   शाहू महाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी कागलच्या (कोल्हापूर जिल्हा) घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब तर आईचे नाव राधाबाई घाटगे असे होते. १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावास आनंदीबाईंनी दत्तक घेतले, तेव्हापासून ते शाहू महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. सुरुवातीचे शिक्षण त्यांना कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले व फिट्झिराल्ड यांनी दिले, त्यानंतर इ.स. १८८५ मध्ये त्यांना राजकोट येथील राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयात पाठविण्यात आले. १८९० ते १८९४ या काळात त्यांनी सर एस.एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्यकारभार आणि जगाचा इतिहास इत्यादी विषयांचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतली. त्या वेळी लोकमान्य टिळकांनी केसरीत 'करवीरक्षेत्री कपिलाषष्ठीचा योग' या शिर्षकाचा अग्रलेख लिहून शाहुराजांचे हार्दिक अभिनंदन केले. तत्पूर्वी, म्हणजे १ एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह बडोदा येथील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला. लक्ष्मीबाई त्यावेळी ११ वर्षांच्या होत्या. शाहू मुहाराजांना ४ अपत्ये होती. राधाबाई व आऊसाहेब या दोन मुली व राजाराम महाराज व शिवाजी महाराज ही दोन मुले. आऊसाहेब लहानपणीच वारल्या तर शिवाजी महाराज रानडुकरांचा पाठलाग करताना मरण पावले.   छत्रपती शाहू १२ वर्षांचे असताना म्हणजे २० मार्च १८८६ ला त्यांचे वडील आबासाहेबांचे निधन झाले. त्यांची आई राधाबाई त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी निवर्तल्या होत्या. इ.स. १८९५ च्या जानेवारीत नववर्षाच्या निमित्ताने महाराणी व्हिक्टोरियाने जी.सी.एस.आय. किताब त्यांना दिला. पुढे छत्रपती शाहूचे प्रजेविषयीच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतूक करून ब्रिटिश सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाने त्यांना 'महाराज' ही पदवी बहाल केली. त्यामुळे लोकांचा राजा शाहू हे २४ में १९०० पासून छत्रपती शाहू महाराज बनले.   महाराजांनी मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी केला. जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता दूर करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.  समाजसुधारणेच्या कार्यात त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. १९१३ मध्ये प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असावी असे आदेश त्यांनी दिले. शिक्षकांची पगारावर नेमणूक करणे सुरू केले. ख़ेड्यातील मंदिरे, चावड़ी व धर्मशाळा येथे प्राथमिक शाळा सुरू केल्या. शिक्षकांना सरकारी नोकर समजण्यात येऊ लागले. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी रेल्वेस्टेशनजवळ शाहूपुरी या गुळाच्या व्यापार पेठेची स्थापना केली. शाहू महाराज विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक मानले जातात. खेड्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केल्याशिवाय त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार नाही. यासाठी त्यांनी वसतिगृहाची सोय केली. १८ एप्रिल १९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लवकरच दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाल ब्राह्मण वसतिगृह, इंडियन-ख्रिश्चन हॉस्टेल, ढोर-चांभार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, रावसाहेब सबनीस प्रभू बोर्डिंग इत्यादी सुमारे २३ वसतिगृहे त्यांनी सुरू केली. इ.स. १८९९ मध्ये महाराज पूजा करीत असताना पुरोहित नारायणभटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणू लागले. महाराजांनी याचे कारण विचारले असता नारायण भटजी म्हणाले, "वेदोक्ताची अधिकार केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच आहे, आपण क्षुद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही." यामुळे महाराजांच्या स्वाभिमानाला हादरा बसला. १९०१ मध्ये महाराजांनी वैदिक वाङ्मयप्रवीण ब्राह्मणांकडून वेदोक्त पद्धतीने श्रावणी करून घेण्यासाठी आप्पासाहेब राजोपाध्ये यांना वारंवार कळवूनही त्यांनी नकार दिला. या वादात लोकमान्य टिळकांनी पुरोहितांची बाजू मांडली. श्रृंगारीच्या शंकराचार्यांनी पुरोहितांची बाजू घेतली. केसरी व इतर वृत्तपत्रांनी महाराजांवर टिका केली. पुढे १९०५ मध्ये महाराजांनी राजोपाध्ये यांची इनामी गावे व जमिनी जप्त केल्या. ब्राह्मणांची इनामे जप्त केली. कालांतराने 'क्षात्रजगतगुरू' हे पद निर्माण करून त्या पीठावर मराठा जातीतील एका व्यक्तीची नेमणूक केली. पुरोहितांची शाळा काढली. ब्राह्मणेतरांना पुरोहिताची कामे शिकविण्यात आली. अर्थातच असे केल्याने पुरोहित महाराजांच्या विरुद्ध गेले. पुरोहितांनी इंग्रज सरकारकडे दाद मागण्याचे ठरविले. त्यावेळी महाराजांनी 'गादी गेली तरी चालेल, पण मी माझा निर्णय बदलणार नाही', असे ठणकावून सांगितले. पुढे मुंबईच्या गव्हर्नरने महाराजांचा निर्णय योग्य ठरविला. त्यामुळे पुरोहितांना नमते घेणे भाग पडले.   भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असे; परंतु अनियमित पावसामुळे रास्त भाव मिळण्यासाठी, अशा लोकांच्या उदरनिर्वाहार्थ २७ सप्टेंबर १९०६ मध्ये 'श्री शाह स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' ची स्थापना करण्यात आली. इ.स. १९०७ मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला भोगावती नदीला बंधारा घालून पाणीपुरवठा करण्याची योजना महाराजांनी आखली. १९०८ ला बंधारा बांधून 'महाराणी लक्ष्मीबाई तलाव' तयार केला. १९०७ मध्ये सहकारी तत्वावर सूतगिरणी सुरू केली. तसेच निपाणी येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. १९०८ मध्ये राधानगरी नावाचे गाव वसविले. १९१३ मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा कोल्हापूरमध्ये सुरू केली. २५ जुलै १९१७ मध्ये महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले आणि २१ नोव्हेंबर १९१७ पासून कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. १९१८ मध्ये कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली आणि राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजची जबाबदारी आर्य समाजाकडे सोपविली. इ.स. १९०७ साली अस्पृश्यांसाठी 'मिस क्लार्क' वसतिगृह सुरू केले. इ.स. १९१९ मध्ये कायदा करून बलुतेदारी/ वेठबिगारी पद्धती बंद केली. याचा भंग करणाऱ्या व्यक्तीला १०० रु. दंडाची तरतूद केली. अस्पृश्य तरुणांची तलाठी पदावर नेमणूक केली. कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापूरच्या चौकात चहाचे दुकान काढून दिले. इ.स. १९१९ मध्ये अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळा बंद पाडल्या व अस्पृश्यांच्या मुलांना सरकारी शाळेतून इतर जातीच्या मुलांप्रमाणे दाखल करून घ्यावे, असे धोरण जाहीर केले. उच्च शिक्षणासाठी नादारी देताना प्रथम शेती व मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलांना अस्पृश्य जातीच्या मुलांना नादारी द्यावी असे धोरण स्विकारले. राजाराम कॉलेज सुरू केले. राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी फी माफ करण्यात आली. महाविद्यालयासाठी दरवर्षी ५०,००० रु. अनुदान दरबारातून दिले. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तांत्रिक शिक्षणाची आवड तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी 'जयसिंगराव घाडगे टेक्नीकल इन्स्टिट्यूट' ची स्थापना केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाई. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी जीवनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून 'इन्फ्रट्री स्कूल' सुरू केले. अशाप्रकारे दरवर्षी सरकारी महसूलापैकी सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जात होती. अशाप्रकारे , लोकसंपर्क साधून, आर्थिक दुरवस्था नष्ट करून व मनात प्रतिष्ठा स्थापून शाहू महाराजांनी अस्पृश्यांना मानाचे स्थान दिले, परंतु राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यांना मानाचे स्थान देण्यासाठी अस्पृश्यांच्या सामाजिक परिषदा भरवणे महत्त्वाचे होते. तेव्हा शाहूंनी दत्तोबा पवार, गंगाराम यमाजी कांबळे, शिवराम कांबळे, अप्पाजी वाघमारे, दादागोंडा पाटील, डॉ. आंबेडकर यांच्या सहाय्याने २० मार्च १९२० मध्ये कोल्हापूरजवळील माणगाव येथे अस्पृश्यांची एक परिषद बोलावली. त्याचप्रमाणे १७ मे १९२० मध्ये नागपूर येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली. नंतर १३ व १४ फेब्रुवारी १९२२ रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले. इ.स. १९१७ मध्ये शाहू महाराजांनी 'पुनर्विवाह' नोंदणी कायदा अंमलात आणला. मुलींसाठी शाळा तर त्यांनी याआधीच काढल्या होत्या. त्यांची विधवा सून इंदुमती राणी साहेबांनाही शिक्षणाची दारे खुली केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाहासंबंधीचा कायदा पास केला, त्याचप्रमाणे हिंदू समाज रचनेवर क्रांतिकारक परिणाम करणारी हिंदू संहिता संमत करण्यात आली. सहा फुट चार इंच उंचीचे बलदंड शरीर, कणखर धिप्पाड बुलंद बुरजासारखी रूंद छाती, टपोरे पाणीदार डोळे, पहाडी आवाज, सिंहासारखा डौलदार चेहरा आणि पहाडाशी टक्कर घेईल अशी अफाट ताकद असलेल्या या राजाला, नियतीने उणेपुरे ४८ वर्षांचे आयुष्य दिले. महाराजांनी एकदा चार बैल, मोट स्वतः हातांनी ओढून पाटात पाणी सोडून दिले. केवढी प्रचंड ताकद होती ती. या पोलादी शरीरालाही काळ दहा-वीस वर्षे पुढे ढकलता आला नाही. २६ जुलै १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात जन्माला आलेले महाराज पावणे दहाव्या वर्षी दत्तक विधान, २०व्या वर्षी राजगादीवर आले. राज्यारोहण झाले आणि पुढील फक्त २८ वर्षे जनतेची सेवा केली. ६ मे १९२२ मध्ये मुंबईत अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. बहुजन समाज दुःखसागरात बुडाला. करवीर नगरीचा, बहुजनांचा कर्तबगार राजा काळाच्या पडद्याआड गेला.

राजर्षी शाहू महाराज


शाहू महाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी कागलच्या (कोल्हापूर जिल्हा) घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब तर आईचे नाव राधाबाई घाटगे असे होते. १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावास आनंदीबाईंनी दत्तक घेतले, तेव्हापासून ते शाहू महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. सुरुवातीचे शिक्षण त्यांना कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले व फिट्झिराल्ड यांनी दिले, त्यानंतर इ.स. १८८५ मध्ये त्यांना राजकोट येथील राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयात पाठविण्यात आले. १८९० ते १८९४ या काळात त्यांनी सर एस.एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्यकारभार आणि जगाचा इतिहास इत्यादी विषयांचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतली. त्या वेळी लोकमान्य टिळकांनी केसरीत 'करवीरक्षेत्री कपिलाषष्ठीचा योग' या शिर्षकाचा अग्रलेख लिहून शाहुराजांचे हार्दिक अभिनंदन केले. तत्पूर्वी, म्हणजे १ एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह बडोदा येथील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला. लक्ष्मीबाई त्यावेळी ११ वर्षांच्या होत्या. शाहू मुहाराजांना ४ अपत्ये होती. राधाबाई व आऊसाहेब या दोन मुली व राजाराम महाराज व शिवाजी महाराज ही दोन मुले. आऊसाहेब लहानपणीच वारल्या तर शिवाजी महाराज रानडुकरांचा पाठलाग करताना मरण पावले.


छत्रपती शाहू १२ वर्षांचे असताना म्हणजे २० मार्च १८८६ ला त्यांचे वडील आबासाहेबांचे निधन झाले. त्यांची आई राधाबाई त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी निवर्तल्या होत्या. इ.स. १८९५ च्या जानेवारीत नववर्षाच्या निमित्ताने महाराणी व्हिक्टोरियाने जी.सी.एस.आय. किताब त्यांना दिला. पुढे छत्रपती शाहूचे प्रजेविषयीच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतूक करून ब्रिटिश सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाने त्यांना 'महाराज' ही पदवी बहाल केली. त्यामुळे लोकांचा राजा शाहू हे २४ में १९०० पासून छत्रपती शाहू महाराज बनले.


महाराजांनी मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी केला. जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता दूर करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.  समाजसुधारणेच्या कार्यात त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. १९१३ मध्ये प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असावी असे आदेश त्यांनी दिले. शिक्षकांची पगारावर नेमणूक करणे सुरू केले. ख़ेड्यातील मंदिरे, चावड़ी व धर्मशाळा येथे प्राथमिक शाळा सुरू केल्या. शिक्षकांना सरकारी नोकर समजण्यात येऊ लागले. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी रेल्वेस्टेशनजवळ शाहूपुरी या गुळाच्या व्यापार पेठेची स्थापना केली. शाहू महाराज विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक मानले जातात. खेड्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केल्याशिवाय त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार नाही. यासाठी त्यांनी वसतिगृहाची सोय केली. १८ एप्रिल १९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लवकरच दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाल ब्राह्मण वसतिगृह, इंडियन-ख्रिश्चन हॉस्टेल, ढोर-चांभार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, रावसाहेब सबनीस प्रभू बोर्डिंग इत्यादी सुमारे २३ वसतिगृहे त्यांनी सुरू केली. इ.स. १८९९ मध्ये महाराज पूजा करीत असताना पुरोहित नारायणभटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणू लागले. महाराजांनी याचे कारण विचारले असता नारायण भटजी म्हणाले, "वेदोक्ताची अधिकार केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच आहे, आपण क्षुद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही." यामुळे महाराजांच्या स्वाभिमानाला हादरा बसला. १९०१ मध्ये महाराजांनी वैदिक वाङ्मयप्रवीण ब्राह्मणांकडून वेदोक्त पद्धतीने श्रावणी करून घेण्यासाठी आप्पासाहेब राजोपाध्ये यांना वारंवार कळवूनही त्यांनी नकार दिला. या वादात लोकमान्य टिळकांनी पुरोहितांची बाजू मांडली. श्रृंगारीच्या शंकराचार्यांनी पुरोहितांची बाजू घेतली. केसरी व इतर वृत्तपत्रांनी महाराजांवर टिका केली. पुढे १९०५ मध्ये महाराजांनी राजोपाध्ये यांची इनामी गावे व जमिनी जप्त केल्या. ब्राह्मणांची इनामे जप्त केली. कालांतराने 'क्षात्रजगतगुरू' हे पद निर्माण करून त्या पीठावर मराठा जातीतील एका व्यक्तीची नेमणूक केली. पुरोहितांची शाळा काढली. ब्राह्मणेतरांना पुरोहिताची कामे शिकविण्यात आली. अर्थातच असे केल्याने पुरोहित महाराजांच्या विरुद्ध गेले. पुरोहितांनी इंग्रज सरकारकडे दाद मागण्याचे ठरविले. त्यावेळी महाराजांनी 'गादी गेली तरी चालेल, पण मी माझा निर्णय बदलणार नाही', असे ठणकावून सांगितले. पुढे मुंबईच्या गव्हर्नरने महाराजांचा निर्णय योग्य ठरविला. त्यामुळे पुरोहितांना नमते घेणे भाग पडले.


भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असे; परंतु अनियमित पावसामुळे रास्त भाव मिळण्यासाठी, अशा लोकांच्या उदरनिर्वाहार्थ २७ सप्टेंबर १९०६ मध्ये 'श्री शाह स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' ची स्थापना करण्यात आली. इ.स. १९०७ मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला भोगावती नदीला बंधारा घालून पाणीपुरवठा करण्याची योजना महाराजांनी आखली. १९०८ ला बंधारा बांधून 'महाराणी लक्ष्मीबाई तलाव' तयार केला. १९०७ मध्ये सहकारी तत्वावर सूतगिरणी सुरू केली. तसेच निपाणी येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. १९०८ मध्ये राधानगरी नावाचे गाव वसविले. १९१३ मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा कोल्हापूरमध्ये सुरू केली. २५ जुलै १९१७ मध्ये महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले आणि २१ नोव्हेंबर १९१७ पासून कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. १९१८ मध्ये कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली आणि राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजची जबाबदारी आर्य समाजाकडे सोपविली. इ.स. १९०७ साली अस्पृश्यांसाठी 'मिस क्लार्क' वसतिगृह सुरू केले. इ.स. १९१९ मध्ये कायदा करून बलुतेदारी/ वेठबिगारी पद्धती बंद केली. याचा भंग करणाऱ्या व्यक्तीला १०० रु. दंडाची तरतूद केली. अस्पृश्य तरुणांची तलाठी पदावर नेमणूक केली. कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापूरच्या चौकात चहाचे दुकान काढून दिले. इ.स. १९१९ मध्ये अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळा बंद पाडल्या व अस्पृश्यांच्या मुलांना सरकारी शाळेतून इतर जातीच्या मुलांप्रमाणे दाखल करून घ्यावे, असे धोरण जाहीर केले. उच्च शिक्षणासाठी नादारी देताना प्रथम शेती व मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलांना अस्पृश्य जातीच्या मुलांना नादारी द्यावी असे धोरण स्विकारले. राजाराम कॉलेज सुरू केले. राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी फी माफ करण्यात आली. महाविद्यालयासाठी दरवर्षी ५०,००० रु. अनुदान दरबारातून दिले. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तांत्रिक शिक्षणाची आवड तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी 'जयसिंगराव घाडगे टेक्नीकल इन्स्टिट्यूट' ची स्थापना केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाई. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी जीवनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून 'इन्फ्रट्री स्कूल' सुरू केले. अशाप्रकारे दरवर्षी सरकारी महसूलापैकी सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जात होती. अशाप्रकारे , लोकसंपर्क साधून, आर्थिक दुरवस्था नष्ट करून व मनात प्रतिष्ठा स्थापून शाहू महाराजांनी अस्पृश्यांना मानाचे स्थान दिले, परंतु राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यांना मानाचे स्थान देण्यासाठी अस्पृश्यांच्या सामाजिक परिषदा भरवणे महत्त्वाचे होते. तेव्हा शाहूंनी दत्तोबा पवार, गंगाराम यमाजी कांबळे, शिवराम कांबळे, अप्पाजी वाघमारे, दादागोंडा पाटील, डॉ. आंबेडकर यांच्या सहाय्याने २० मार्च १९२० मध्ये कोल्हापूरजवळील माणगाव येथे अस्पृश्यांची एक परिषद बोलावली. त्याचप्रमाणे १७ मे १९२० मध्ये नागपूर येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली. नंतर १३ व १४ फेब्रुवारी १९२२ रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले. इ.स. १९१७ मध्ये शाहू महाराजांनी 'पुनर्विवाह' नोंदणी कायदा अंमलात आणला. मुलींसाठी शाळा तर त्यांनी याआधीच काढल्या होत्या. त्यांची विधवा सून इंदुमती राणी साहेबांनाही शिक्षणाची दारे खुली केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाहासंबंधीचा कायदा पास केला, त्याचप्रमाणे हिंदू समाज रचनेवर क्रांतिकारक परिणाम करणारी हिंदू संहिता संमत करण्यात आली. सहा फुट चार इंच उंचीचे बलदंड शरीर, कणखर धिप्पाड बुलंद बुरजासारखी रूंद छाती, टपोरे पाणीदार डोळे, पहाडी आवाज, सिंहासारखा डौलदार चेहरा आणि पहाडाशी टक्कर घेईल अशी अफाट ताकद असलेल्या या राजाला, नियतीने उणेपुरे ४८ वर्षांचे आयुष्य दिले. महाराजांनी एकदा चार बैल, मोट स्वतः हातांनी ओढून पाटात पाणी सोडून दिले. केवढी प्रचंड ताकद होती ती. या पोलादी शरीरालाही काळ दहा-वीस वर्षे पुढे ढकलता आला नाही. २६ जुलै १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात जन्माला आलेले महाराज पावणे दहाव्या वर्षी दत्तक विधान, २०व्या वर्षी राजगादीवर आले. राज्यारोहण झाले आणि पुढील फक्त २८ वर्षे जनतेची सेवा केली. ६ मे १९२२ मध्ये मुंबईत अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. बहुजन समाज दुःखसागरात बुडाला. करवीर नगरीचा, बहुजनांचा कर्तबगार राजा काळाच्या पडद्याआड गेला.


Post a Comment (0)
Previous Post Next Post