भीम झिजला कसा, अंत झाला कसा
भीम झिजला कसा अंत झाला कसा? चंदनाल पुसा हे चंदनाला पुसा ।।धृ।।
जीव आपुला हा सर्वांस प्यारा असे ।
जगासाठी हे जीवन जळाले कसे ?
निंद नेत्रांना नसताना निजला कसा?...।।१।।
पोर वाला तो कोटीचा होता जरी
प्रश्न सर्वांच्या रोटीचा होता तरी
या अवनीत दिन दयाळ धजला कसा?...।।२।।
उभ्या वाऱ्याने विझला ना वामन कधी
कठोर कष्टाने थकलाना वामन कधी
दीप दिल्लीचा तो आज विझला कसा?...।।३।।