विक्षिप्त आमंत्रण | Vikshipt Aamantran | Akbar Birbal Story in Marathi

विक्षिप्त आमंत्रण


एकदा बादशहा बिरबलावर कधी नाही तो रागावला. 

परिणाम?


बिरबल, बादशहाचा राग शांत होऊ देण्याकरिता दिल्ली सोडून निघून गेला. सुरुवातीचे काही दिवस बादशहाला विरवलाची अनुपस्थिती फारशी जाणवली नाही. पण नंतर मात्र आपण बिरबलावर रागावल्याबद्दल बादशहाला पश्चाताप झाला.


बरं, बिरबल कुठ गेला होता है कुणालाच माहीत नव्हतं. कारण तसं त्यानं कुणाला सांगितलं नव्हतं, ना त्यानं आपला पत्ता कुणाकडं देऊन ठेवला होता. अर्थातच मग त्याला स्वत: जाऊन बोलावण्याचे सारे मार्गच खुंटले होते !


बिरबलाला शोधून काढण्याकरिता मग बादशहानं एक शक्कल लढवली. आपल्या साऱ्या मांडलिक राजांना त्यानं एक खलिता पाठवला. मजबूर होता, "आमच्या राज्यातील समुद्राचं लग्न ठरलं आहे, म्हणून आपल्या प्रांतातल्या नद्याना आमच्याकडे त्वरित पाठवावं."


बादशहाच्या ह्या विक्षिप्त आमंत्रणानं साऱ्याच मांडलिक राजांना बुचकळयात पाडलं. समुद्राच्या लग्नाकरिता नद्यांना कसं पाठवावं, त्यांना कळेना. ते सारे गप्प राहिले.


इकडे बादशहा आपण पाठविलेल्या निमंत्रणाला काय प्रतिसाद येतो याची वाट पाहत राहिला. तथापि कुणाही मांडलिक राजाचं उत्तर न आल्यामुळे बादशहा चिंतित झाला.


खरं म्हणजे बिरबलाला शोधून काढण्यासाठीच बादशहाला समुद्राचं लग्न आरंभावयाची कल्पना सुचली होती. पण याही आमंत्रणाला कुणाचंच उत्तर न आल्यामुळे विरवलाचा मागमूस लावायची आपली इच्छा फलद्रूप होणार नाही असं बादशहाला वाटायला लागून तो अधिकच उदास झाला.


एके दिवशी उद्विग्न मनानं बादशहा दरबारात बसला असताना हुजयान एक लखोटा आणून बादशहाला दिला. तो आला होता एका मांडलिक राजाकडून-बादशहानं काढलेल्या समुद्राच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेला उत्तर म्हणून. ते होतं पुढीलप्रमाणे ― 

"आपल्या आमंत्रणाप्रमाणं आमच्या राज्यातील नद्या आपल्याकडल्या कार्याला हजर राहायला इकडून निघाल्या आहेत, तरी त्यांच्या स्वागताकरिता आपण आपल्याकडील विहिरींना सामोरे पाठवावे."

आपल्या आमंत्रणाला आलेले हे एकुलते एक उत्तर वाचताच वादशहानं तात्काळ ओळखलं, की त्याच्या मागचा 'बोलविता धनी' बिरबलच असला पाहिजे.


बादशहानं मग जातीनं जाऊन त्या मांडलिक राजाची भेट घेतली आणि आपला अंदाज अगदी बरोबर ठरल्यावर मोठ्या इतमामानं त्यानं बिरबलाला दरबारात नेलं आणि पूर्वीच्या मानाच्या जागी त्याला नेऊन बसवलं.

Post a Comment (0)
Previous Post Next Post