जा, घेऊन ये | Ja Gheu Ye | Akbar Birbal Story in Marathi

"जा, घेऊन ये"


एके दिवशी सकाळी बादशहानं मंचकावर पडल्या-पडल्याच हुजरयाला फर्मावलं, "जा, घेऊन ये. 

बादशहाची ही विचित्र आज्ञा कशी पाळावी हे त्या हुजऱ्याला कळेना. कार्य घेऊन ये? तोंड धुवायला पाणी की नाश्ता, त्या बापड्याला समजेना पण बादशहाला पुन्हा विचारायचं काही त्याला धाडस होईना, तो तसाच तिथं उभा राहिला.


हुजऱ्या अद्यापही तिथं तसाच उभा आहे हे पाहून बादशहा त्याच्यावर संतापला आणि त्याच्या अंगावर खेकसला, "घेऊन ये सांगितलं ना ! चल जा इथून." 

विचारा हुजर्या अधिकच घाबरला. तो तसाच पळतपळत जवळच असलेल्या विरवलाच्या निवासस्थानी आला आणि त्याला सारी हकीगत सांगून, त्यातून काही मार्ग काढावयाची विनंती केली. 

बिरबलानं विचारलं, "काय रे, तुला घेऊन ये असं सांगितलं, त्यावेळी जहाँपनाह नेमकं काय करत होते हे नीट सांगता येईल तुला ?"


"होय महाराज," हुजऱ्या सांगू लागला "बादशहा सलामत मंचकावर उठून बसले आणि आपली दाढी खाजवत एकदम मला पाहून म्हणाले, "जा, घेऊन ये." 

"ठीक, तर मग आता तू पटकन न्हाव्याला त्यांच्याकडं घेऊन जा, म्हणजे झालं !" बिरबलानं त्याला सांगितलं. हुजऱ्या न्हाव्याला घेऊन आलेला पाहताच बादशहाचा चेहरा प्रफुल्लित झाला आणि त्यानं हुजयाला विचारलं, "तुला न्हाव्याला आणायला कुणी सांगितलं ?


"बिरबलसाहेबांनी, सरकार," हुजऱ्या चटकन् बोलून गेला. 

"बिरबलासारखा चतुर माणूस मिळणं कठीण !" बादशहा उद्गारला आणि त्यानं न्हाव्याला आपली दाढी करायला सांगितली.

Post a Comment (0)
Previous Post Next Post