थंडी किती पडली ? | Thandi Kiti Padali | Akbar Birbal Story in Marathi

थंडी किती पडली ?


काय कडाक्याची थंडी पडली होती त्या दिवशी वाटत होतं. माणूस गोठून जातो की काय ! बादशहा आणि बिरबल राजवाड्याच्या महालातल्या एका खिडकीत उभे राहून बाहेरच्या वातावरणाचे निरीक्षण करत होते.


इतक्यात बादशहनं विचारलं, "बिरबल, थंडी किती पडली आहे रे?"

" "दोन मुठी, सरकार," बिरबल तात्काळ म्हणाला.

"दोन मुठी थंडी ?" बादशहानं आश्चर्यानं विचारलं, "दोन मुठी थंडी कशी काय?" खेडुताकडं बिरबलानं बोट दाखवलं―आपल्या दोन्ही हाताच्या मुठी वळून काखेत धरून खेडूत चालला होता. 


थंडी मोजायच्या बिरबलाच्या या 'बॅरामीटर'चं बादशहाला मोठ कौतुक वाटलं आणि तो आपल्या या आवडत्या दरबाऱ्याकडं हसत हसत पाहत राहिला.

Post a Comment (0)
Previous Post Next Post