सोन्यानं भरली ओटी
काखेत पोरगं हातात झाडनं
डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता न खायाला भत्ता
फजिती होती माय मोठी
म्हाया भिमानं भिमानं माय
सोन्यानं भरली ओटी ।।धृ।।
मूडग्या झोपडीले
होती माय मुडगी ताठी
फाटक्या लुगड्याले
होत्या माय सतरा गाठी
पोरगं झालं साहेब
अन सुना झाल्या साहेबीन
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
म्हाया भिमानं भिमानं माय
सोन्यानं भरली ओटी ।।१।।
सांगू सांगू मी केले
केले माय भलते कष्ट
नव्हतं मिळत माय
खरकट आणि उष्ट
अरे असाच घास दिला भिमानं
झकास वरनं वाटी
म्हाया भिमानं भिमानं माय
सोन्यानं भरली ओटी ।।२।।
म्हवा उत्तम माय
खेळतामेळता होता
तेव्हा साऱ्यांचा
मुळीच पत्ता नव्हता
पूर्वीच्या काळात असच होतं
अन बातम्या लई हो खोटी
म्हाया भिमानं भिमानं माय
सोन्यानं भरली ओटी ।।३।।