
प्रथम नमू गौतमा
शांतीदूताच्या वैभवशाली
जाऊनिया आश्रमा ...२
प्रथम नमू गौतमा चला हो,
प्रथम नमू गौतमा ।।धृ।।
तथागताची तत्त्वप्रणाली
आचरण्याची मुभा मिळाली
जीवनानंदे आज बहरली
वैशाखी पौर्णिमा ...२
प्रथम नमू गौतमा चला हो
प्रथम नमू गौतमा ।।१।।
करू बुद्धमय उभ्या धरेला
बेत मनीचा नेत इरेला
रम्य चंद्रमा आज उदेला
इथेच थोडे रमा ...२
प्रथम नमू गौतमा चला हो
प्रथम नमू गौतमा ।।२।।
शुद्ध शीलाचं लेऊन लेणं
बुद्धं सरणं गाऊ गाणं
करुया पावन अपुले जीवन
होऊन सारे जमा ...२
प्रथम नमू गौतमा चला हो,
प्रथम नमू गौतमा ।।३।।