दलितांचा राजा भीमराव माझा
दलितांचा राजा भीमराव माझा
दलितांचा राजा भीमराव माझा
दिनदुबळ्यांना झाला सावली
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
दलितांचा राजा भीमराव माझा
दिनदुबळ्यांना झाला सावली
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
दलितांच्या कुटूंबात जन्म त्यान घेतला
शिक्षणाच्या अमृताचा पान्हा त्यानं जाणिला
ज्ञान सारा घेऊनिया बंधु भाव वेचला
ज्ञान सारा घेऊनिया बंधु भाव वेचला
अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा हा पेटला
दलित उध्दाराची आन त्याने घेतली
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
गुरं-ढोरं पाणी पिती दलित राही दुरं
कंठ त्याचा कोरडा नी डोळ्यामधी पुर
जाणुनिया मन त्यांच भीम हो अधीर
जाणुनिया मन त्यांच भीम हो अधीर
खुलं केलं महाडचं तळं चवदारं
असं दलितांना दिलं पाणी ओंजळी
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
दिनांसाठी गीळूनीया सारे अपमान
स्वयंतेज बुध्दीने मिळविला हो मान
शोषितांची, पिडीतांची वाढविली शान
शोषितांची, पिडीतांची वाढविली शान
फुलांनीहे सुगंधलं वाळलेलं जान
अशी समतेची धुरा बाबा वाहिली
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
दलितांचा राजा भीमराव माझा
दलितांचा राजा भीमराव माझा
दिनदुबळ्यांना झाला सावली
त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली
हो त्यानं माणसाला माणुसकी दावली