आभाळाचे तारे सारे आज आनंदी झाले
आभाळाचे तारे सारे ।
आज आनंदी झाले गं
भीम जयंतीसाठी सारे
भीम वाडीला आले गं... ।।धृ।।
रंग रुपेरी होते सारे ।
आज परंतु न्यारे न्यारे
रंगीबिरंगी शेले सारे ।
आनंदाने ल्याले गं...।।१।।
उंच आभाळी राहणारे
मौज भूमीची पाहणारे
आभाळाचे डोळे सारे ।
झाले जयभीम वाले गं...।।२।।
कोणं गं बाई वामनवाणी ।
भीम सख्याची गाई गाणी
कंठ पहाडी गाणे त्याचे
सप्त सुराने न्हाले गं...।।३।।