सोन्याच्या ताटात जेवते बाबासाहेबाची खानदान
काल जरी आमच्या घरी
नव्हतं पितलीचं पानदान
नव्हतं पितळीचं पानदान
आज सोन्याच्या ताटात जेवते
बाबासाहेबाची खानदान ...(२)
कुत्री मांजरी आमचा धन
कुत्री मांजरी आमचा धन
घरधनाची झोपडी होती ...(२)
आज माळीसमोर गाडी
आहे सोन्यात हिरे मोती ...(२)
पक्षी गहू तांदूळ मऊ
पक्षी गहू तांदूळ मऊ
सुक्या मेव्याची नाही वाट
सुक्या मेव्याची नाही वाट
आज सोन्याच्या ताटात जेवते
बाबासाहेबांची खानदान ...(२)
गेला जौहार मायबाप
गेला जौहार मायबाप
स्वाभिमानाने जयभिम करतो ...(२)
देव दगडाचे फेकून दिले
देव दगडाचे फेकून दिले
तथागताचे चरण भरतो ...(२)
भिमाचं देणं, काही नव नऊन ...(२)
आता नाही कशाची वाण ...(२)
आज सोन्याच्या ताटात जेवते
बाबासाहेबाची खानदान ...(२)
तालुक्याच्या ठायी पाई ...(२)
जात होता माझा बाप ...(२)
आज जपान अमेरिकेला ...(२)
जातो बसून विमानात ...(२)
गावंढळी बोली सोडून गेली ...(२)
आता इंग्लिश बोलतोय छान ...(२)
आज सोन्याच्या ताटात जेवले
बाबासाहेबाची खानदान ...(२)
काल मुर्त्यावरचे कपडे ...(२)
तेही मिळत नव्हते तिथं ...(२)
बाबा भिमाच्या कृपेमुळे ...(२)
आज लागले टाय अनं कोट ...(२)
मनाचा राजा समाज माझा ...(२)
आज मिळतोया मानबान ...(२)
आज सोन्याच्या ताटात जेवते
बाबासाहेबाची खानदान ...(२)