सोन्या मोत्याची माळ
सोन्या मोत्याची माळ
गळी बांधो कोनी
सुखान राहु दे माझं काळ मनी ।।धृ।।
परदेशी साहेब जातात ग
आठव बाई मजला तो होतोच ग
ना दिसतांना मला वाटे रात सुनी
सुखान राहु दे माझं काळ मनी ।।१।।
साहेब बाई माझं ग विद्याधर
नाव तयांच गाजे जगभर
माझ्या साहेबांवाणी नाही जगी कोणी
सुखान राहु दे माझं काळ मनी ।।२।।
साहेबांचं ग बाई नाम मुखी
त्यातच ग बाई मी आहे सुखी
ध्यानी पुस्तकं ग करते आठवणी
सुखान राहु दे माझं काळ मनी ।।३।।
सकपाळ कुळाची मी आहे ग सून
स्वाभिमानी उर माझा येतो भरून
अंगावर साडी जरी असली जुनी
सुखान राहु दे माझं काळ मनी ।।४।।
सोन्या मोत्याची माळ
गळी बांधो कोनी
सुखान राहु दे माझं काळ मनी