पत्रात लिहिते रमा
पत्रात लिहिते रमा
अहो पत्रात लिहिते रमा
माझी चिंता...
माझी चिंता ना करतास का
मी हा परिवार सांभाळीते
तुम्ही साहेब स्वतःला जपा ।।धृ।।
उपाशी कधी मी, शिळे पाते खाईल
तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील
करू नका हो पर्वा, सांभाळीते मी सर्वा
तुमची रामू, ही रामू मी बोलते स्वतः
अहो तब्येतीकडे लक्ष द्या
फळ येईल...
फळ येईल तुमच्या तपा
मी हा परिवार सांभाळीते
तुम्ही साहेब स्वतःला जपा ।।१।।
कष्टाची माझ्या, चिंता नसू द्या
अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असू द्या
तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं
पदवी घेऊनी, घेऊनी, घेवून यावं
अहो वेळेवर जेवण करा
आठवूणी....
आठवणी हो मम व्यथा
मी हा परिवार सांभाळीते
तुम्ही साहेब स्वतःला जपा ।।२।।
जरी व्होवो वणवण, मला मान्य आहे
तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे
माझे सौभाग्य हे, माझे अवभाग्य हे
पती लाभले, लाभले तुमच्या परी
अहो धनी तुम्ही सावध रहा
वार करतील...
वार करतील कुणी छुपा
मी या लेकरांना सांभाळीते
तुम्ही साहेब स्वतःला जपा ।।३।।
पत्र आले तुमचे, लई आनंद झाला
यशवंत आणि अहो तुमच्या रमाला
दंडवत करते मी निसदीप स्मरते मी
कोटी या दीनांचे...
या दीनांचे साथ व्हा तुम्ही
या मनोजराजा परी...
आला या, आला या हो नावा रूपा
मी हा परिवार सांभाळीते
तुम्ही साहेब स्वतःला जपा ।।४।।