माझ्या भीमाच्या कीर्तिपुढे
नेते बापुडे, फिके पडती गडे, हे बडेबडे
माझ्या भीमाच्या कीर्तिपुढे ।।धृ।।
थोर तो महान, पर्वतासमान
तया भोवताली टेकड्या ह्या सान सान सान
असा तो महान गगना तो भिडे, पायथ्याचे खडे, हे बडेबडे
माझ्या भीमाच्या कीर्तिपुढे ।।१।।
तो खरा पिता, आज पिडिता
यांच्या ममतेचा घडा सदा रिता रिता रिता
खरा तो पिता
सागर तो गडे, गमती बुडेबुडे, हे बडेबडे
माझ्या भीमाच्या कीर्तिपुढे ।।२।।
गर्व हा गळे, द्वेषही पळे
दृष्टी दुनियेची भीमाकडे वळे वळे वळे
गर्व हा गळे
नवे नाते जडे, नमती फाकडे, हे बडेबडे
माझ्या भीमाच्या कीर्तिपुढे ।।३।।